March 13, 2026

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री. प्रवीण भानुदास घेमूड यांची निवड.

01/2/2026

JPI भवनात भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात आज खास विशेष पदांची नेमणूक करण्यात आली त्यात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी श्री प्रवीण भानुदास घेमूड यांची नेमणूक करण्यात आली. व हवेली तालुक्यातील श्री अंगद बेंगळे यांना हवेली तालुकाध्यक्ष पदी व पुणे शहरातील श्री चिदानंद होसमने यांची अध्यक्ष पुणे शहर वाहतूक आघाडी पदी, व अविनाश आवटे यांची भारतीय जनवादी कामगार आघाडी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व पदग्रहण केलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकता व अखंडता संविधान वाचवण्याची शपथ JPI कार्यालयात घेतली. श्री प्रवीण घेमुड यांच्या पक्ष प्रवेशामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उत्साह निर्माण झाले आहे. श्री प्रवीण घेमूड यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की मला पक्षाने संधी दिली आहे त्या संधीचे मी सोनं करीन, आणि पक्ष मजबूत व संघटित करून तळागाळातील गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावेल. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सांगितले की माझी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. भारतीय जनवादी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ए. के.भारती ( माजी खासदार ) भारत सरकार

व राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष H.Q.S.जलीलूर रेहमान व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांचे आभार व्यक्त केले व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.. 💐💐💐💐

Written by

Anil Divanji Mallav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION