April 2, 2026

के. रामलू पथनाट्य स्पर्धेत मिलिंद विद्यालयाचा प्रथम क्रमांक

कुंडलवाडी: के. रामलू नाबाद नगराध्यक्ष सामाजिक ग्रुप तसेच नगरपरिषद कुंडलवाडी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथनाट्य स्पर्धेत माध्यमिक गटातून मिलिंद विद्यालय, कुंडलवाडी येथील विद्यार्थी संघाने सादर केलेल्या “सध्याचे राजकारण व लोकशाही समोरील आव्हाने” या विषयावरील पथनाट्यास प्रथम क्रमांक मिळाला.

विद्यार्थ्यांनी सध्याच्या राजकारणातील विविध पैलू आपल्या अभिनयातून प्रभावीपणे सादर केले. तसेच निवडणूक आयोग आणि भारतीय संविधानाची भूमिका काय असते, याचेही सादरीकरण करण्यात आले.

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार तसेच उपस्थित नागरिकांच्या समक्ष विजेत्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्षा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या नाटकासाठी विद्यार्थ्यांना सौ. एल.आर. तेलगाणे, संतोष चंदनकर, अमरदीप दगडे व सतीश अंबेराय या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन करताना दगडे सर म्हणाले की अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते आणि अशा स्पर्धा नियमितपणे आयोजित केल्या जाव्यात.

विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION