‘खाकी स्वॅग’चा ट्रेंड आटोक्यात येणार, पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी
कोल्हापूर : प्रतिनिधी
सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
Maharashtra Police : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
Maharashtra Police : विधानसभेतही मुद्दा उपस्थित
सोशल मीडियावर ‘खाकी स्वॅग’ दाखवणाऱ्या व्हिडिओंचा ट्रेंड वाढत असल्याने याबाबत काही आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावीत, शासकीय पदनाम, लोगो, कार्यालयाचा पत्ता किंवा शासकीय मालमत्ता वैयक्तिक खात्यावर वापरू नये, तसेच कोणतीही गोपनीय माहिती पूर्वपरवानगीशिवाय प्रसारित करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.