March 28, 2026

“पेट्रोल पंपांवर नियम कडक! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय”

अमरदीप दगडे | नांदेड प्रतिनिधी:

नांदेड जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पॅनिक खरेदी वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. या परिस्थितीमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून इंधन व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात कोणताही इंधन तुटवडा नाही. मात्र अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे खरी गरज असलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
🔴 मुख्य निर्णय काय?
👉 पॅनिक खरेदीवर निर्बंध
दुचाकी वाहनांसाठी:
Without Gear: ₹200 पर्यंत इंधन
With Gear: ₹300 पर्यंत इंधन
चारचाकी वाहनांसाठी:
₹500 पर्यंत इंधन
मोठ्या वाहनांसाठी:
₹1000 पर्यंत इंधन
👉 डब्यांमध्ये इंधन देण्यास बंदी
पेट्रोल पंप चालकांनी कोणत्याही परिस्थितीत कॅन, डब्बा किंवा इतर भांड्यांमध्ये इंधन देऊ नये, असे स्पष्ट आदेश.
👉 गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना
पोलिसांच्या मदतीने टोकन पद्धत राबविणे
आवश्यकतेनुसार ग्राहकांना प्राधान्याने इंधन वितरण
👉 फलक लावणे बंधनकारक
प्रत्येक पेट्रोल पंपावर “इंधन साठा मर्यादित आहे” व “अनावश्यक सेवांना प्राधान्य नाही” असे फलक लावणे आवश्यक.
🚨 कडक कारवाईचा इशारा
जर कोणी काळाबाजार करताना किंवा नियमांचे उल्लंघन करताना आढळले, तर संबंधित पेट्रोलियम अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
🚑 अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र व्यवस्था
रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आदी अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र Emergency Lane तयार करण्यात येणार आहे. या सेवांना त्यांच्या गरजेनुसार इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
📢 प्रशासनाचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, पॅनिक खरेदी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

Marketing Managed by - KARIYO TECH SOLUTIONS

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION