April 4, 2026

बिलोलीत 6 वर्षीय बालिकेचा विनयभंग POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

बिलोली येथील जुन्या गावातील रहिवासी असलेल्या एका 21 वर्षे तरुणाने घरी कोणी नसल्याची संधी साधून जवळच्या सहा वर्षीय बालिकेस तुमचे शिवणकाम झालेले कपडे घेऊन जा असे कारण सांगून आपल्या घरी बोलावले व तिचा विनयभंग केला. बालिकेने तिथून पळ काढत स्वतःचे घर गाठले व घडलेला प्रसंग स्वतःच्या आईस सांगितला. बालिकेच्या आईने जास्त वेळ न लावता लगेच बिलोली पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या प्रसंग सांगून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या अर्जावरून बिलोली पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने त्वरित कारवाई करत प्रकरणाची चौकशी केली व आरोपीस ताब्यात घेतले. चौकशी अंती आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 व POCSO कायदा अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले. आरोपीस दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता दंडाधिकाऱ्यांनी आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली. पीडिताच्या आईने तक्रार दाखल करतात ज्या तत्परतेने बिलोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलिसांनी जी कारवाई केली त्याबद्दल परिसरातून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION