March 13, 2026

बिलोली पोलीस ठाण्याची कमान पुन्हा एकदा अतुल भोसले यांच्याकडे; विश्वासाचे पुनरुज्जीवन

अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी):
बिलोली पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे 40 दिवसांपूर्वी त्यांचे येथून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मात्र आता जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांच्याकडे बिलोली पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली आहे.
पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी काल बिलोली पोलीस ठाण्याचा प्रभार स्वीकारला. त्यांच्या मागील कार्यकाळात बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना चांगले यश मिळाले होते. त्यामुळेच जिल्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत बिलोली पोलीस ठाण्याची कमान त्यांच्या हाती सोपवलेली आहे.
या नियुक्तीमुळे पुन्हा एकदा PI भोसले यांच्याकडून अवैध धंद्यांना बंदी, गुन्हेगारांना चाप तर सामान्य नागरिकांना न्याय मिळण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.
अल्पावधीतच झालेल्या या पुनरागमनामुळे बिलोलीत चर्चा रंगल्या असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे बिलोली पोलीस ठाण्याची कमान पुन्हा एकदा अतुल भोसले यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आली आहे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION