April 5, 2026

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

पुणे जिल्हा रिपोर्टर 19/02/26 भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अनिल मल्लाव यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांच्या छत्रपती व मावळ्यांच्या भूमिकेमध्ये मोठ्या संख्येने  लहान मुली व मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये शिवाजी महाराज की जय जय भवानी….. जय शिवाजी या आवाजाने शिरूर मध्ये शिवमय वातावरण निर्माण केले.या मिरुणूकीमध्ये प्रामुख्याने महिला ही उपस्थित होत्या. छत्रपती शिवरायांनी शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली व प्रागतीक राज्य उभे केले आश्चर्यकारक वेगवान हालचाली तसेच बलाढ्य शत्रूंचे मनोबल खच्ची करणारे अचूक हल्ले यांचा वापर करून त्यांनी गनिमी काव्याचे तंत्र अत्यंत यशस्वीपणे राबवले मिळालेल्या राज सत्तेचा उपयोग लोक कल्याणासाठी करत सार्वभौम स्वराज्य स्थापना करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा

Written by

ANIL DIVANJI MALLAV

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION