April 10, 2026

महाराष्ट्रभर शिष्यवृत्ती परीक्षेचा उत्साह; बिलोली तालुक्यातही विद्यार्थ्यांची दमदार उपस्थिती

अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी):
आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच वर्ग पाचवी व पूर्व माध्यमिक म्हणजेच वर्ग आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. बिलोली तालुक्यातही शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.मिळालेल्या माहितीनुसार बिलोली तालुक्यामध्ये पाचवीसाठी एकूण 1181 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी प्रत्यक्षात 1156 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण 743 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता त्यापैकी प्रत्यक्षात 707 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली.
उपस्थितीचे प्रमाण पाहता पूर्व उच्च प्राथमिक मध्ये एकूण अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 97.88% विद्यार्थी तर उच्च माध्यमिक मध्ये अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 95.15% विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते.
गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ही शिष्यवृत्ती परीक्षा अतिशय सुरळीत पार पाडली जाईल याची उत्तम नियोजन करण्यात आले होते. रविवारी या परीक्षेसाठी पूर्व उच्च प्राथमिक साठी एकूण आठ केंद्र तर पूर्व माध्यमिक साठी सहा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या एकूण 14 केंद्रांसाठी तालुक्यातील 120 शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या 8 फेब्रुवारी 2020 च्या आधी सूचनेनुसार यावर्षी शासनाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक झाल्यानंतर देणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यानुसार वर्ग 5 वी शिष्यवृत्तीधारकास 5000 रुपये प्रति वर्ष प्रमाणे एकूण दोन वर्षासाठी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून वर्ग 8 वी शिष्यवृत्तीधारकास 7500 रुपये प्रति वर्ष प्रमाणे 2 वर्षासाठी एकूण 15000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे पुढील वर्षापासून वर्ग 8 वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली असून आता केवळ वर्ग 4 थी आणि 7 वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा राहतील.

एकंदरीतच आज बिलोली तालुक्यामधील सर्वच केंद्रावरती या दोन्ही वर्गासाठीच्या परीक्षा अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये व सुरळीत पार पडल्या.
श्री.सुरेश राठोड
(विषयतज्ञ)
गट_शिक्षणाधिकारी कार्यालय बिलोली.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION