April 4, 2026

महिला मंडळींनी साहित्याचा योग्य उपयोग करावे- जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे बारा महिला भजनी मंडळांना साहित्य वितरण

महिला मंडळींनी साहित्याचा योग्य उपयोग करावे- जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे

बारा महिला भजनी मंडळांना साहित्य वितरण

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- आज स्पर्धेच्या युगात वावरत असतांना युवा मुले कुठल्याही कार्यक्रमात डिजे च्या तालावर मनोरंजन करत असतात. ते सुद्धा आवश्यक आहे. मात्र आध्यात्मिक व परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. ते सुद्धा भजन, कीर्तन, अभंग तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. आज विज्ञानाला आध्यात्मिकाची जोड असणे आवश्यक आहे. या उदात्त हेतूने महिला मंडळांना साहित्य वितरण करण्यात आले आहे. म्हणून महिला मंडळींनी साहित्याचा योग्य उपयोग करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम सभापती प्रेम भाऊ वनवे यांनी केले.
ते रीट मारूती (हनुमान) देवस्थान सालेबर्डी (पांधी) येथे हनुमान जयंती निमित्त सावरी क्षेत्रातील महिला भजनी मंडळांना ढोलक (नाल) वाद्य साहित्य वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम सभापती प्रेम भाऊ वनवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रीट मारूती (हनुमान) देवस्थान समितीचे अध्यक्ष नजिर हरिभाऊ बान्ते, उपाध्यक्ष, सचिव व संत विठ्ठल रूखमिनी महिला भजन मंडळ अध्यक्ष लता दुर्योधन बान्ते, परमात्मा एक महिला भजन मंडळ अध्यक्ष प्रमिला अनिल सतदेवे, बजरंग महिला भजन मंडळ अध्यक्ष मंगला प्रल्हाद गंथाडे, माऊली महिला भजन मंडळ अध्यक्ष करिष्मा नरेंद्र मने, रुक्मिणी महिला भजन मंडळ अध्यक्ष भावना योगेश सदावर्ती, महालक्ष्मी महिला भजन मंडळ अध्यक्ष शितल प्रवीण उराडे, आई वाराणसी महिला भजन मंडळ अध्यक्ष रेखा दयाराम समरीत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य सभापती प्रेम भाऊ वनवे यांच्या स्थानिक विकास निधीतून सावरी क्षेत्रातील संत विठ्ठल रूखमिनी महिला भजन मंडळ सालेबर्डी (पांधी), बजरंग महिला भजन मंडळ खैरी, माऊली महिला भजन मंडळ कवडसी, महालक्ष्मी महिला भजन मंडळ कवडसी, सावित्रीबाई फुले महिला भजन मंडळ कवडसी, रूक्मिणी महिला भजन मंडळ कवडसी, आई वाराणसी महिला भजन मंडळ कवडसी, गुरूमाऊली महिला भजन मंडळ साहुली, सतसंग महिला भजन मंडळ साहुली, शारदा महिला भजन मंडळ साहुली, महालक्ष्मी महिला भजन मंडळ कवडसी, परमात्मा एक महिला भजन मंडळ सालेबर्डी अशाप्रकारे बारा महिला भजनी मंडळांना ढोलक (नाल) वाद्य साहित्य वितरण करण्यात आले.
त्याबद्दल साहुली क्षेत्रातील दहा महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम सभापती प्रेम भाऊ वनवे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार पोलिस पाटील हिरालाल पुडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रीट मारूती (हनुमान) देवस्थान समितीचे पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच सावरी क्षेत्रातील कुंता नागेश्वर बांते, शारदा विजय सार्वे, ममता राजेंद्र तिजारे, अनिता हिरालाल पुडके, बबिता लक्ष्मण मते, शालु विजय चवळे, दीपा दिनकर घोल्लर, रंजू मोहनदास वनवे, काजल अमीत वनवे, प्रिती महेश सदावर्ती, आशा जाखमाते, सुनिता रवी बारई, रितू रामविजय पुडके, ज्योती तुकाराम समरित महिला भजनी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION