पुणे जिल्हा रिपोर्टर 23 मार्च 26 बलिदान दिन निमित्त अमर शहीद भगतसिंग यांचे विचार आणि घोषणा देश प्रेमाची प्रेरणा देतात. अशीच एक भेट भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मल्लाव,व भारतीय जनवादी पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण मल्लाव यांनी आज तहसील कार्यालय येथे सावळाराम आवारी यांची भेट घेतली व त्यांची आंदोलन, व अतिक्रमण विषयी चर्चा करण्यात आली. आजच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी शिरूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत शिरूर तहसीलदार कार्यालय शिरूर येथे 23 मार्च 2026उपोषनास सुरुवात केली.जिल्हा प्रशासन असो या तालुका प्रशासन असो अथवा शिरूर नगरपरिषद असो वारंवार निवेदन देऊनही कोणती ठोस कारवाई न केल्यामुळे अखेर त्यांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला शिरूर शहरातील बेकायदा बांधकाम प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री सावळाराम आवारी यांनी जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण असेच चालू राहील शिरूर शहरात कोरोनाच्या काळापासून झपाट्याने अतिक्रमण वाढले आहे जे मागील नगरपालिका मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्या काळात प्रशासनाचे राज्य असल्याकारणाने मनमानी कारभार करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पुर नियंत्रण रेषा केंद्र शासनाच्या आदेशानुसार नदीचे पात्र वाढल्यामुळे रमनगरी परिसरात टाऊन प्लॅन डीपी रोड पूर रेषेच्या क्षेत्रात येत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकामे करण्यात आली. तसेच जिजामाता गार्डन ते सेंट्रल दवाखाना रोड या भागात फूथपाट फूथपाट वरील मोठ्या प्रमाणात व्यावसायिक टपऱ्या चे अतिक्रमण दिसून येत आहे. फूथपाटच गायब झाले आहे ज्यामुळे पादत्रांना चालणे ही कठीण झाले आहे. त्या रोड वरती वारंवार अपघात ही होतात. प्रामुख्याने झपाट्याने वाढलेला मंगलमूर्ती नगर या ठिकाणी काही ठिकाणी नोटीस देऊनही अद्याप कारवाई करण्यात आली नाही. समाजसेवक म्हणून सावळा आवारी यांनी वारंवार प्रशासन व शिरूर नगरपरिषद यांना वारंवार पत्रव्यवहार निवेदन देऊनही काही कारवाई करण्यात आली नाही. अतिक्रमण तात्काळ आणि निष्कासित करण्याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे मात्र अद्यापही क्षेत्रीय स्तरावर त्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे तरी शिरूर नगरपरिषद अंमलबजावणीस उदासीन दिसून येत आहे. अतिक्रमणातील मुद्द्यांवरती प्रशासन काय भूमिका घेत आहे यावर आता शिरूर नगरीतील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
