राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त सकल हिंदू समाज इंद्रायणी जलवायू वस्ती येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भगवामय वातावरणात पार पडले. या संमेलनास माननीय श्री दादा वेदक जी,केंद्रीय सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषद, श्री सुरज सिंग अमृते,अखिल विश्व गायत्री परिवार प्रमुख उपस्थित राहून जमलेल्या हिंदू बांधवांना संबोधित केले.
कार्यक्रमाची सुरुवात विविधतेतून एकता ह्या संकल्पनेने सादरीकरणाने झाले. महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात,केरळ ह्या राज्यातील संस्कृतीचे म्हणजेच लेझीम,लोकमाता अहिल्याबाई होळकरांचा पोवाडा,जोगवा,गरबा डान्स,केरळी नृत्य,कर्नाटकी नृत्य आणि शिवयोद्दा मर्दानी खेळाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गायत्री परिवारतर्फे दीपयज्ञाचे महत्त्व पटवून देत तो दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन करत उपस्थितांची वाईट सवयींचा त्याग करण्याची प्रतिज्ञा घेत, ‘दीपयज्ञ’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तन कार्यक्रमातून बंधुभाव व एकात्मतेची भावना दृढ होत असून, प्रभू श्रीराम यांच्या विचारांची अंमलबजावणी या कार्यातून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदूंनी परस्पर संपर्क वाढवून एकमेकांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.जातीपातीतील भेदभाव आज कालबाह्य झाले असून, हिंदू एकतेच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती वेळेवर रोखणे आवश्यक आहे. आजच्या काळात सर्व हिंदूंमध्ये एकात्मता निर्माण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
#हिंदुमहासंमेलन