*१२ एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील विघ्नहर्ता डेंटल केअरचा “प्रथम वर्षपूर्ती सप्ताह” निमित्त विविध उपचारांवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत*
*१२ एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील विघ्नहर्ता डेंटल केअरचा “प्रथम वर्षपूर्ती सप्ताह” निमित्त विविध उपचारांवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
शहरातील नवाब नगर, मांडवा रोड परिसरातील डॉ.प्रणव प्रवीण उमराणे यांच्या विघ्नहर्ता डेंटल केअरचा प्रथम वर्धापन दिन १२ एप्रिल रोजी उत्साहात साजरा होणार आहे. गेल्या एका वर्षात रुग्णांना दर्जेदार व विश्वासार्ह दंतसेवा देत या दवाखान्याने अनेकांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलवले आहे.
या वर्धापन दिनानिमित्त दि. १० एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान “प्रथम वर्षपूर्ती सप्ताह” आयोजित करण्यात आला असून, या कालावधीत रुग्णांसाठी मोफत दंत तपासणी तसेच विविध उपचारांवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत स्माईल डिझायनिंग, रूट कॅनाल ट्रीटमेंट, स्केलिंग (दात स्वच्छ करणे), इम्प्लांट्स व डेंचर्स, वाकडे दात सरळ करणे, अक्कल दाढ शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांसाठी विशेष दंतसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा व विशेष सवलतींचा अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व 7666312701 या क्रमांकावर नोंदणी करून वरील उपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन विघ्नहर्ता डेंटल केअरतर्फे डॉ.प्रणव प्रवीण उमराणे यांनी केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*