March 15, 2026

४० वर्षांची मृदंग साधना… ग्रामीण कलावंताला अखेर जिल्हास्तरीय मान! कोल्हे बोरगावचे विठ्ठलराव नावाडे जिल्हा कलावंत समितीवर. 🥁

अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी):
बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील ज्येष्ठ कलावंत व मृदंग वादक *विठ्ठलराव मोगलाजी नावाडे* यांची नांदेड जिल्हा “राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत” समितीवर सदस्य कलावंत म्हणून निवड करण्यात आली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही निवड जाहीर केली असून या निवडीसाठी खासदार *डॉ.अजित गोपछडे* यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
विठ्ठलराव नावाडे हे मागील तब्बल ४० वर्षांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये मृदंग वादन करत आहेत. आपल्या सातत्यपूर्ण कलासाधनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक मृदंग वादक घडविले असून ग्रामीण भागात कलेचा वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांची जिल्हा कलावंत समितीवर निवड केली आहे.
ग्रामीण भागातील एका ज्येष्ठ कलावंताला मिळालेल्या या मानाच्या निवडीमुळे कोल्हे बोरगाव तसेच परिसरातील नागरिक व कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने ग्रामीण भागातील कलावंताची घेतलेली ही दखल केवळ विठ्ठलराव नावाडे यांच्या कलेचा सन्मान नसून संपूर्ण कलावंत समाजाचा गौरव असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, या निवडीच्या निमित्ताने कोल्हे बोरगाव *येथील जय किसान माध्यमिक विद्यालयात* विठ्ठलराव नावाडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय होपळे,साहेबराव पांचाळ,गणेश सुवर्णकार ,बळीराम हासगुळे,अशोक होरे,सुभाष आगसे,संतोष पाटील,अतुल गोपछडे,गोविंद मदेवाड,हाणमंत उतरवाड,निळकंठ मुठनवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक विजय होपळे म्हणाले की, ग्रामीण भागातील एका ज्येष्ठ कलावंताचा जिल्हा प्रशासनाने केलेला हा सन्मान अत्यंत अभिमानास्पद आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही निवड शक्य झाली असून कोल्हे बोरगावकरांसाठी ही गौरवास्पद बाब आहे. विठ्ठलराव नावाडे यांच्या मार्गदर्शनातून अनेक कलावंत घडले असून ते आजही आपली कला सेवा सातत्याने सुरू ठेवत आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच *संस्थेचे सचिव उमाकांत रावजी गोपछडे* यांच्या वतीने विठ्ठलराव नावाडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 🎶🥁

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION