April 4, 2026

रामलिंग महाराज यात्रेनिमित्त सर्व शिवभक्तांना जय भवानी मित्र मंडळ व भारतीय जनवादी पार्टी तर्फे सरबत वाटपाचे कार्यक्रम…

पुणे जिल्हा रिपोर्टर. 15/02/26 प्रभू राम च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित जुने शिरूर येथील रामलिंग मंदिरामध्ये आज महाशिवरात्री निमित्त  आज लाखो प्रमाणात भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. रामलिंग महाराज की जय.. हर हर महादेव या आवाजाने रामलिंग परिसर शिवमय झाले. रामलिंग महाराजांची यात्रा ही महाशिवरात्र रोजी सालाबादप्रमाणे होते. या यात्रेमध्ये बरीच जिल्ह्यातुन,तालुक्यातून आणि विविध राज्यातुन  भक्तगण येत असतात. आज जय भवानी मित्र मंडळ व भारतीय जनवादी पार्टी मार्फत शिवभक्तांना सरबताचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जय भवानी मित्र मंडळ व भारतीय जनवादी पार्टीचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल मल्लाव पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण मल्लाव, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन मल्लाव तालुका कोषाध्यक्ष रोहित मल्लाव, तालुका  सरचिटणीस माधव सल्ले व शिरूर शहरातील व्यवसायिक सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश मल्लाव या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित होते. जय भवानी मित्र मंडळ व भारतीय जनवादी पार्टी यांच्याकडून सर्व रामलिंग भक्तांना शिवरात्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Written by

ANIL DIVANJI MALLAV

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION