February 22, 2026

बिलोलीत उत्साहात साजरी झाली शिवजयंती! 🏹✨ शिवजन्मोत्सव समिती, बिलोली आणि फरांदे होंडा बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन ❤️🩸

बिलोलीत उत्साहात साजरी झाली शिवजयंती! 🏹✨
शिवजन्मोत्सव समिती, बिलोली आणि फरांदे होंडा बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन ❤️🩸
अमरदीप दगडे: सबंध महाराष्ट्र प्रमाणेच बिलोली मध्ये देखील मोठ्या उत्सवाच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. मुख्य रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास शहरातील प्रमुख पदस्त व्यक्ती, सर्व सुपरिचित व्यक्तीमत्व, स्थानिक प्रशासन,पोलीस प्रशासन, व स्थानिक नागरिकांकडून पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या कार्यास वंदन करण्यात आले.
या शुभ दिनाचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव समिती बिलोली व फरांदे होंडा बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किती स्थानिक नगरसेवक शंकर गायकवाड यांनी सर्वप्रथम रक्तदान केले.विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाद्वारे छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर, बिलोली पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज एपीआय कमल शिंदे व पीएसआय तिडके यांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन स्व इच्छेने रक्तदान केले व इतरांनाही रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या या रक्तदानामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रमामध्ये पोलिस प्रशासनाचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आला व जनतेस एक प्रोत्साहन पर संदेश यातून मिळाला.
महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी आलेल्या एडवोकेट पवार, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, अभिजीत तुडमे, पत्रकार राजेंद्र कांबळे इत्यादींनी या ठिकाणी महाराजांचा पूर्ण कृती अश्वारूढ पुतळा उभारून या पुतळा परिसराचे विस्तारीकरण व सुशोभीकरण करावे अशी मागणी केली. तर यावेळी पोलीस प्रशासनाकडून डीएसपी श्याम पानेगावकर म्हणाले की महाराजांची जयंती आपण सर्वांनीच पारंपारिक पद्धतीने साजरी केली पाहिजे. जिल्हाभरात कुठेही डीजे वाजविण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी जनतेस आवाहन केले की आपण पारंपारिक पद्धतीने महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे आणणारी आणि ध्वनी प्रदूषण टाळून डीजे मुक्त अशी जयंती साजरी करावी.
यावेळी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना या शिबिराचे आयोजक राजू पाटील शिंपाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिराच्या वेळी आपल्या बहारदार सूत्रसंचालनाणे भाऊसाहेब बनबरे यांनी शिबिरात रंगत आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION