February 22, 2026

दहावी बोर्ड परीक्षा सुरू; बिलोली शहरातील एकमेव केंद्र लिटल फ्लॉवर E/M स्कूल पूर्णतः सीसीटीव्ही नियंत्रणाखाली”*

अमरदीप दगडे: राज्यभरामध्ये आजपासून दहावी बोर्ड परीक्षेस सुरुवात झाली असून आज प्रथम भाषा मराठी चा पेपर सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये पार पडला. बिलोली शहरातील एकमेव केंद्र असलेल्या लिटल फ्लॉवर E/M स्कूलमध्ये आजच्या पहिल्या पेपर साठी मराठी माध्यमाचे एकूण 213 पैकी 206 विद्यार्थी उपस्थित होते तर पहिल्याच पेपरला सहा परीक्षार्थी अनुपस्थित होते. या केंद्राचे पूर्ण वर्ग खोल्या व परिसर पूर्णतः सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी मध्ये असल्याने आजचा पेपर अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पडला. शिवाय जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावर्षी पूर्णतः कॉपी मुक्त अभियान राबवण्यास सुरुवात केली असून बैठे पथकाचे मोबाईल देखील परीक्षेचा संपूर्ण काळ हे वेब कास्टिंगने जिल्हा नियंत्रण कक्षशी जोडले गेले असल्याने या कॉपी मुक्त अभियानाची प्रचिती 10 वी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली.
आज पहिल्या पेपरच्या शेवटी कुठलाही गैरप्रकार नोंद झाला नसून एकंदरीतच परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणात पार पडली. पुढील सर्व पेपर देखील अशाच पद्धतीने शांततेत पार पडतील.
*श्रीकांत सूरकुटलावार*
*केंद्र संचालक*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION