गाडगेबाबांच्या विचारांची परंपरा जपणाऱ्या सभेत फुले जयंती उत्साहात, बारुळकरांना श्रद्धांजली
बीड (प्रतिनिधी): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गाडगेबाबांच्या समाजसुधार परंपरेला पुढे नेणाऱ्या विचारवंतांचीही आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या विशेष सभेत ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांच्या अकाली निधनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या सामाजिक व प्रबोधनात्मक कार्याचा गौरव केला. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे बारुळकर यांनी जनजागृतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन गाडगेबाबांच्या समाजसुधार चळवळीची परंपरा पुढे नेणारे ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व प्रबोधन चळवळीतील प्रतिनिधींनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.
ज्येष्ठ शिक्षक नेते प्राचार्य डी. जी. तांदळे, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अशोक येडे, प्रबोधनकार ह.भ.प. नितीन महाराज पिसाळ, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, पर्यावरणप्रेमी अभिमान खरसाडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश मस्के, लेक लाडकी अभियानाचे समन्वयक बाजीराव ढाकणे तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. पंजाब येडे यांसह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. उपस्थितांनी समाजप्रबोधन, शिक्षण आणि समानतेसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन व संचालन ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे यांनी केले.
3 Comments
registerjalwagames
April 15, 2026Yo, signing up for jalwagames was surprisingly easy. Just a heads-up for anyone looking to jump in and play. Registration’s quick! Join the fun: registerjalwagames
lotus365 apk
April 15, 2026Is the Lotus365 APK any good, ya’ll? Saw some ads for it, but wanna hear from real players. Is it worth the download? lotus365 apk
adda52 download
April 15, 2026Looking for the Adda52 download link. Found it! Thanks! Time to play. Get the adda52 download now.