महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती
युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत कार्यरत पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र विभागाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी पोपटराव शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक कार्य, युवकांमध्ये जनजागृती तसेच संघटनात्मक बांधणीमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
शिवाजी शेलार हे वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. युवकांना संघटित करून सामाजिक न्याय, माहिती अधिकार, ग्राहक संरक्षण आणि पोलीस मित्र उपक्रम अधिक बळकट करण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज अहिरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जयश्री ताई अहिरे (राष्ट्रीय महिला अध्यक्षा), वसुधा नाईक (राष्ट्रीय सल्लागार), डॉ. राजेश्वर हेंद्रे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), नानासाहेब बडे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) तसेच ह.भ.प. मधुकर महाराज अहिरे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) उपस्थित होते.