बीड | विशेष प्रतिनिधी
मौजे शिवणी (ता. जि. बीड) येथील डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगरमधील महाविहार धम्मभूमी येथे रविवार, ३१ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जेष्ठ पौर्णिमा महोत्सव, धम्मदेशना आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी आयोजित केला जात आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, बौद्ध धम्माविषयी जनजागृती आणि धम्मसंस्कार वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली/बीड) आहेत.
कार्यक्रमात भिक्खू प्रज्ञापीयो (बुद्ध गया), डॉ. भिक्खू इंदवंस महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) आणि भन्ते बुद्धबोधी (शिवणी) यांची धम्मदेशना आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोहर सिरसाठ (बलभीम महाविद्यालय, बीड) आणि भास्करराव घाडगे (माजलगाव) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
- सकाळी १०:०० : बोधीवृक्ष वंदना
- सकाळी १०:३० ते १२:०० : भोजनदान व खिरदान
- दुपारी १२:०० : त्रिसरण पंचशील व बुद्धवंदना
- दुपारी १२:३० : पाहुण्यांचा सत्कार व मार्गदर्शन
- दुपारी १:०० : धम्मदेशना व कार्यक्रमाची सांगता
भोजनदानाचे सौजन्य आयुष्य मोहिनी अरुण भालेराव (शिरूर कासार) यांचे असून खिरदानाचे आयोजन स्व. विठ्ठलराव किसनराव भद्रे यांच्या स्मरणार्थ चंद्रभागाबाई भद्रे (परळी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड शहर व परिसरातील उपासकांसाठी रविवार सकाळी ११ वाजता बीड बसस्थानक येथून शिवणी बुद्धविहारासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.