येरमाळा | प्रतिनिधी
येरमाळा येथे घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार हणुमंत बारकूल यांच्या मालकीची हिरो होंडा शाईन कंपनीची दुचाकी (क्रमांक MH 25 AF 3148) दि. २४ मे २०२६ रोजी रात्री त्यांच्या घरासमोर उभी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन जागेवर नसल्याचे निदर्शनास आले.
तक्रारदारांनी परिसरात वाहनाचा शोध घेतला. मात्र दुचाकीचा मागमूस न लागल्याने दि. ३० मे २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार, सुमारे ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात व्यक्तीने हँडल लॉक तोडून चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी एफआयआर क्रमांक ०२३५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करण्याचे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.