April 7, 2026

*उदागीर बाबा स्वयंसेवक मंडळाकडून विधिज्ञ संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. सपना चिखले यांचा किल्ला येथे सत्कार*

*उदागीर बाबा स्वयंसेवक मंडळाकडून विधिज्ञ संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. सपना चिखले यांचा किल्ला येथे सत्कार*

उदगीर, (प्रतिनिधी) :
उदगीर विधिज्ञ संघाच्या 2026–27 च्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी अॅड. सपना विजय चिखले यांची निवड झाल्याबद्दल उदागीर बाबा स्वयंसेवक मंडळाच्या वतीने किल्ला परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अॅड. चिखले यांना शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे विधिज्ञ संघात महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात त्या संघाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रम उदागीर बाबा मठ संस्थान, किल्ला येथे पार पडला. यावेळी मठाधीश जयेश गीर गुरु, सतीशगीर महाराज, सोनू महाराज, किरण महाराज यांच्यासह विजय चिखले, विशाल वारकरे, संतोष रावणकोळे, राजू स्वामी, श्रीधर सावळे, सौरभ पत्की, बालाजी पवार, अमोल भवाळ, गौरव बच्चेवार, महेश सोनटक्के, प्रकाश तानशेट्टे, संजयकुमार हलकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते. उपस्थित मान्यवरांनी अॅड. सपना चिखले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION