बावनकुळे यांच्यावर बिनबुडाचे आरोप- भाजपा
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- राज्याचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात सोशल मीडियावर बिनबुडाचे व दिशाभूल करणारे आरोप करणाऱ्या कथित पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा च्या वतीने पोलीस अधीक्षक नुरुल हसन व भंडारा ठाणेदार भुसारी यांना लेखी तक्रार देण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की संबंधित व्यक्तीने कोणतेही ठोस पुरावे नसताना सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे आरोप करून बावनकुळे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजात गैरसमज पसरत असून सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या खोट्या व बदनामीकारक माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत असेही त्यांनी नमूद केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, जिल्हा महामंत्री कल्याणी निखाडे, नगर परिषद नगराध्यक्षा मधुरा मदनकर, नगर परिषद उपाध्यक्षा चंद्रकला भोपे, भाजपा कोषाध्यक्ष चैतन्य उमाळकर, भाजपा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, नगरसेवक कैलास भुरे, मुस्ताक पटेल, नगरसेविका वृषाली ब्राह्मणकर, भाग्यश्री कळंबे, रूबी चढ्ढा, प्रशांत निंबोळकर, पप्पू भोपे, अजय ब्राह्मणकर, रौनक उजवणे, राजकुमार भोजवानी, निलेश गाढवे, शैलेश खरोले, रमेश गिरिपुंजे उपस्थित होते. भाजपाच्या वतीने या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*