भंडारा जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- राज्य शासनाने २८ फेब्रुवारी २०२६ च्या आधारभुत हरभरा खरेदी प्रारंभिक यादीत भंडारा जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. म्हणून भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशु गोनाडे यांनी २० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर २३ मार्च २०२६ ला प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार भंडारा जिल्ह्यात २०२५-२६ किमान आधारभूत किमतीवर हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक ७ एप्रिल ला साई प्लाझा भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांनी याबाबत सविस्तर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र पवनी तालुक्यात सुरू करण्यात आले आहे. दिनांक २९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान नोंदणी प्रक्रियेत ९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यांच्या मालाची मोजणी सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असून मोजणीची अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. प्रति हेक्टर १२.१७ क्विंटल खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हरभऱ्याचा आधारभूत खरेदी दर ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल आहे. तर बाजारभाव यापेक्षा ७०० ते ८०० रुपयांनी अधिक आहे.
तरी जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांनी केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*