April 7, 2026

ग्रीन नेचर तर्फे नेचर पार्कवर सर्पमित्रांचा निसर्गवीर सन्मान चषक देऊन सत्कार जागतिक वसुंधरा घटिका दिन निमित्त

ग्रीन नेचर तर्फे नेचर पार्कवर सर्पमित्रांचा निसर्गवीर सन्मान चषक देऊन सत्कार
जागतिक वसुंधरा घटिका दिन निमित्त

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखनी व साकोली तालुक्यातील सर्पमित्रांचा सत्कार जागतिक वन दिन, जल दिन, चिमणी दिन व हवामान दिन व विश्व वसुंधरा घटिका दिन निमित्ताने लाखनी नेचर पार्कवर आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाखनी नगरपंचायतचे क्रियाशील नगरसेवक संदीप भांडारकर, सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी येथील संचालक डॉ. मनोज आगलावे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी बावनकुळे, जि.प.कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव येथील प्राचार्य प्रदीप गायधनी, शिक्षिका वैशाली गायधनी, स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगावचे ज्येष्ठ शिक्षक विलास कालेजवार, लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक श्यामकांत गिऱ्हेपुजे, नाना ऑप्टिकल्सचे नाना वाघाये व ताजुष शरिया कोचिंग क्लासेस संचालिका मिनाझ मोटलानी, अ.भा.अंनिस तालुका सचिव नामदेव कान्हेकर, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद मेसराम, ग्रीन नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक वैद्य व पदाधिकारी अशोक नंदेश्वर हे सर्व या कार्यक्रमात उपस्थित होते.
ग्रीन नेचर फाउंडेशनचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी मागील २१ वर्षांपासून साकोली व लाखनी तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्पमित्र, निसर्गमित्र तसेच सरीसृप संशोधक यांचा सत्कार कार्यक्रम दरवर्षी न चुकता प्रमुख अतिथीच्या हस्ते नेचर पार्कवर आयोजित करण्यात येतो. कारण सर्पमित्र निसर्गमित्र कोणतीही अपेक्षा न करता प्रत्यक्ष कृतीद्वारे कार्य करून साप, वन्यजीव, जखमी पक्षी एवढेच नव्हेतर वानरे व त्यांची पिल्ले वाचविण्याचे कार्य अहोरात्र वर्षभर करतात. मागील २२ वर्षात हजारो विषारी बिनविषारी सापांना तसेच शेकडो जखमी पक्षी प्राण्यांना जीवदान दिले आहेत. सोबतच अनेकदा वनविभागासोबत वन्यजीवांची सुरक्षित सुटका करण्यासाठी सुद्धा हे सर्पमित्र सहकार्य करतात. रात्री -बेरात्री भीतीग्रस्त व संकटग्रस्त नागरिकांच्या घरून विषारी बिनविषारी सापाचे सुरक्षित सुटका करून कोणताही मोबदला न घेता कृतिशील पर्यावरण संवर्धनाचे कार्य करतात. एवढेच नव्हेतर सर्पदंश झालेल्या नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यापासून डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता ते धावपळ करतात. या धावपळीमुळेच त्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढून अनेकांना जीवदान दिले आहे. इतर अनेक सामाजिक व नागरी संस्था बौद्धिक, साहित्यिक, वैचारिक तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा भरपूर सत्कार करतात पण स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यावरणाचे या महत्वपूर्ण घटकाला व लोकांना वाचविण्यासाठी निसर्गमित्र व सर्पमित्र धावपळ करतात यांचा मात्र सत्कार करताना दिसत नाहीत.
यामुळेच ग्रीन नेचर फाउंडेशन यांचा सत्कार मागील २१ वर्षापासून दरवर्षी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या अजोळ अशा निसर्गसंवर्धन कार्यक्रमाला सलाम करीत असतो अशी माहिती त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी निसर्गविर सन्मान पुरस्कार सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, सर्पमित्र पंकज भिवगडे, सलाम बेग, मयूर गायधने, साकोलीचे युवराज बोबडे, रोशन बागडे, दर्वेश दिघोरे, पोहरा धनंजय कापगते रेंगेपार कोहळी, वैभव कांबळे सेलोटी, खेमराज हुमे पिंपळगाव, नितीन निर्वाण, गगन पाल लाखनी, साकोली मध्ये कार्यरत असलेले अमित चौधरी, सुरेंद्र राऊत, समीर राऊत, विक्की नेवारे, निशांत आतीलकर या सर्वांना ग्रीन नेचर फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निसर्गवीर सन्मान चषक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्पमित्र व निसर्गमित्र, सरीसृप संशोधक यांचे कौतुक केले व त्यांचा सन्मान केल्यामुळे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच ग्रीन नेचर फाउंडेशनच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची प्रशंसा केली. ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब मार्फत तयार झालेले साकोलीचे सर्व सर्पमित्र युवराज बोबडे, रोशन बागडे व त्यांची टीम मागील १० वर्षापासून पिटेझरी येथील निसर्गप्रेमी नागरिकांनी कळविल्यानंतर पिटेझरी क्षेत्रात व परिसरात अनेक स्नेक रेस्क्यू करीत लोकांना व सापांना सुरक्षित ठेवीत पर्यावरण संवर्धन करीत असल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रीन नेचर फाउंडेशनचे पदाधिकारी अशोक वैद्य व प्रास्ताविक करताना ग्रीन नेचर फाउंडेशनचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी केले तर आभार उपस्थितांचे अशोक नंदेश्वर यांनी मानले.
[06/04, 6:58 pm] devashishtokekar05: *Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION