April 5, 2026

५ ला भंडारा येथे चालत्या फिरत्या आंबेडकर मेळाव्याचे राज्यव्यापी आयोजन

५ ला भंडारा येथे चालत्या फिरत्या आंबेडकर मेळाव्याचे राज्यव्यापी आयोजन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- “कहीं हम भूल न जायें” या अभियाना अंतर्गत- बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी चळवळी प्रती जनजागृती निर्माण करण्याकरिता _*”चालत्या फिरत्या आंबेडकर मेळाव्याचे राज्यव्यापी आयोजन रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ लाभ सकाळी १० वाजता महाबोधी बुद्धविहार, शास्त्री चौक भंडारा येथे आंबेडकरवादी चळवळ आणि आपली जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अतुल पाटील आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक, नागपूर येथील ॲड. रितेश पाटील, इंजी. बालू रत्नपारखी, ॲड. अश्विनी मून आंबेडकरवादी चळवळीच्या अभ्यासक, नागपूर. इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी बहुजन समाजातील नागरिकांनी मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या महापुरुषांद्वारे सुरू करण्यात आलेल्या परिवर्तनवादी चळवळीला समजून घेऊन गतिमान करण्याकरिता सहयोग करावा. व “चालता फिरता आंबेडकर मेळाव्याला जास्तीत -जास्त संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
Editor/Reporter/Journalist
*INDIAN PRESS UNION*
District Reporter

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION