April 8, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन 8 ते 14 एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर, दि. 8 ( प्रतिनिधी ) :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक 8 ते 14 एप्रिलदरम्यान विभागातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा तसेच जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा प्रशासन, कोल्हापूर आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी बिंदू चौक येथे करण्यात आले.

आज गुरुवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहामार्फत गावस्तरावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, बाबासाहेबांचे महिलाविषयक कार्य व संत गाडगे महाराजांचे सामाजिक कार्य या विषयावर प्रा. डॉ. जगन कराडे यांचे समाज कल्याण कार्यालय येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता सामाजिक न्याय विभागाकडील शिष्यवृत्ती व इतर योजनांचे लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात समाज कल्याण कार्यालय वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायं. 5 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहामध्ये भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 वाजता आरोग्य विभागाशी समन्वय साधून ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता महिला मेळावा व संविधानावर आधारित डॉ. रुपा कुलकर्णी, श्रीमती सुनंदा मेटकर यांचे जाहीर व्याख्यान समाज कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सायं. 5 वाजता सत्यशोधक मूकनायकांचा विचार “काल, आज आणि उद्या” या विषयावर रवींद्र खैरे यांचे जाहीर व्याख्यान शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.

शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील 4 शासकीय वसतिगृहामध्ये सचिन परब, सचिन कांबळे, सुरेखा डवर, अनुराधा कांबळे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 वाजता समाज कल्याण कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 वाजता श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उप आयुक्त, समाज कल्याण, पुणे व विविध शासकीय अधिकारी यांची औद्योगिक संस्था मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

मंगळवार, 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बिंदू चौक येथे संविधानिक मूल्यांवर आधारित पथनाट्याचे आयोजन. सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महामानवांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION