April 4, 2026

*हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहनं रस्त्यावर धावत*

*हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहनं रस्त्यावर धावत*

(गजानन ढाकुलकर )हिंगणा : नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.

आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
District Reporter

Disclaimer:
This article is based on the author’s personal assessment and available local information. The views expressed are solely those of the author and do not constitute the official stance of the Indian Press

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION