जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : वाढत्या धकाधकीच्या कालखंडात तसेच शासकीय सेवेत असताना कार्यालयीन कामकाजामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या तब्येतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिवशीय मोफत मौखिक आरोग्य व सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व रोग निदान तपासणी व्हॅनला भेट देवून उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला .
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गीता पिल्लई आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
या आरोग्य शिबिरात स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांचे दंत, नेत्ररोग, रक्त, इसीजी, मौखिक कॅन्सर आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत कार्यरत असलेले ॲपल, नंदादीप, स्वस्तिक, जानकी आणि कोल्हापूर आर्थो ॲण्ड ट्रामा सेंटर या रुग्णालयाच्या सहाय्याने हे आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचा सुमारे १६० हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. विक्रम आरळेकर, डॉ.रेणुका वडूलेकर, डॉ. रेशम रजपूत, डॉ.मनीष पाटील, डॉ.भूमिका फत्तेवाडे, डॉ.शिल्पा तोरगळकर, श्रीमती आशा कुडचे(CPM) पूजा दासरे, श्रीमती भट यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.