April 3, 2026

मालेगावचे ह.भ.प नाना महाराज कापडणीस यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

📍 नाशिक | प्रतिनिधी
इंडियन प्रेस युनियन (IPU) महाराष्ट्र राज्याच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत कार्यरत पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना मध्ये महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे।
संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री रवींद्रजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मा.श्री. ह.भ.प नाना महाराज कापडणीस यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच तक्रार समिती अध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे।
मा.श्री. ह.भ.प नाना महाराज कापडणीस हे समाजसेवा, जनजागृती व धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असून त्यांनी अनेक वर्षे समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून गरजू नागरिकांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समस्या सोडवणे व युवकांना मार्गदर्शन करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे।
या नियुक्तीमागील मुख्य उद्देश म्हणजे संघटनेचा विस्तार संपूर्ण भारतभर करण्याचा आहे. पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशातील प्रत्येक राज्यात पोहोचावी, अशी संस्थेची भूमिका आहे. सध्या महाराष्ट्रात संघटनेचे कार्य उत्तम प्रकारे सुरू असून गोरगरिब व गरजू नागरिकांसाठी ही संघटना मजबूत आधार बनत आहे।
संस्थेचे स्वप्न आहे की, देशभरातील विविध राज्यांमधून कार्यकर्ते व पदाधिकारी हळूहळू संघटनेत सहभागी व्हावेत आणि समाजसेवेचा हा प्रवास अधिक व्यापक व्हावा. सर्व राज्यांतून संघटनेला प्रतिसाद मिळाल्यास हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।
स्थानिक स्तरावरही त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।
🖊️ Reporter:
अमर शिवाजी पठारे
इंडियन प्रेस युनियन (IPU)

AMAR SHIVAJI PATARE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION