पै.दिग्विजय भोंडवे २ -या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कीताबाचा मानकरी – पै.संदीप भोंडवे
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सहकार्याने दीनांक ३१ मार्च व १ एप्रिल २०२६ ला देवळी जिल्हा वर्धा येथे वरिष्ठ ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद तथा २ री ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेच्या खुल्या वजनगटामध्ये पुणे जिल्ह्याचा पैलवान पै.दिग्विजय संदीप भोंडवे यांने बुलढाण्याच्या पै.अक्षय शेळकेवर मात करत मानाचा ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कीताब मिळवला. या कीताबा सोबत तो चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.
कार्यक्रमाला ना.प्रा. अशोक उईके ( आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य ), ना.श्री. पंकज भोयर ( राज्यमंत्री(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म तथा पालकमंत्री वर्धा ), महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा.खासदार श्री रामदास तडस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी पै. दिग्विजय भोंडवे यांचा चांदीची गदा प्रदान करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा. खासदार श्री रामदासभाऊ तडस यांनी केले होते.
*स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे*
*५५ कीलो*
प्रथम – पै.अजय निंबाळकर – सोलापुर,
व्दितीय – पै.दीनेश काकडे – मुंबई उपनगर,
तृतीय – पै.संकेत पाटील – कोल्हापुर
तृतीय – पै.यशराज मोरे – सोलापुर शहर
*६० कीलो*
प्रथम – पै.विश्वजित मोरे – कोल्हापुर जिल्हा
व्दितीय – पै.जयदीप बडरे – मुंबई शहर
तृतीय – पै.लकी खरात – मुंबई उपनगर
तृतीय – पै.प्रतिक काळेल – पुणे जिल्हा
*६३ कीलो*
प्रथम – पै.पार्थ कंधारे – पुणे शहर
व्दितीय – पै.अथर्व वाघमोडे – मुंबई उपनगर
तृतीय – पै.ज्ञानेश्वर देसाई – कोल्हापुर
तृतीय – पै धनराज जाधव – सातारा
*६७ कीलो*
प्रथम – पै.माऊली टीपगुडे – कोल्हापुर जिल्हा
व्दितीय – पै.साई उमाप – पुणे जिल्हा
तृतीय – पै.अजिंक्य माचुत्रे – पिं.चिंचवड
तृतीय – पै.तुषार चटदुखे – चंद्रपुर
*७२ कीलो*
प्रथम – पै.ओंकार पाटील – कोल्हापुर
व्दितीय – पै.सुरज गबाले – नाशिक
तृतीय – पै.सुरज सावंत – पुणे शहर
तृतीय – पै.सुरज जाधव – ठाणे जिल्हा
*७७ कीलो*
प्रथम – पै.स्वरुप चौगुले – कोल्हापुर
व्दितीय – पै.ओमकार झाडे – नाशिक
तृतीय – पै.गणेश खाडे – ठाणे शहर
तृतीय – पै.अंकीत यादव – अमरावती
*८२ कीलो*
प्रथम – पै.अनिकेत जाधव – मुंबई शहर
व्दितीय – पै.अथर्व शेंडकर – पुणे शहर
तृतीय – पै.करण ढाणे – सोलापुर
तृतीय – पै.अदीनाथ पाटील – कोल्हापुर
*८७ कीलो*
प्रथम – पै.विनय पुजारी – कोल्हापुर
व्दितीय – पै.विशाल वाळुंज – पुणे
तृतीय – पै.व्यंकटेश बनकर – अंहील्यानगर
तृतीय – पै.जय वेहेले – ठाणे शहर
*९७ कीलो*
प्रथम – पै.अदीत्य मोहोळ – पुणे शहर
व्दितीय – पै.यज्ञेश शितोळे – सातारा
तृतीय – पै.पृथ्वीराज पडघम – धाराशिव
तृतीय – पै.योगिराज नागरगोजे – लातुर
*ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी वजनगट*
प्रथम – पै.दिग्विजय भोंडवे – पुणे
व्दितीय – पै.अनिल शेळके – बुलढाणा
तृतीय – पै.अनिल गिरमल – कोल्हापुर
तृतीय – पै.ऋषिकेश बोमने – लातुर
अशाप्रकारे कुस्तीगीरांनी विजय मिळवुन आपल्या जिल्हा, शहर व वस्तादांचे नाव लौकिक केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
Editor/Reporter/Journalist
*INDIAN PRESS UNION*
District Reporter