नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील नादुरुस्त साहित्य अखेर दुरुस्त करण्यात आले
*नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील नादुरुस्त साहित्य अखेर दुरुस्त करण्यात आले असून, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल अमरनाथ यात्री संघातर्फे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांचे आभार मानण्यात आले, तर जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.*
दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रेकरूंच्या चालण्याचा व प्राणायामाचा सराव संघाचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सेतू, गोवर्धन घाट येथे घेतला जात आहे. येत्या 3 जुलै रोजी होणाऱ्या 27 व्या अमरनाथ यात्रेसाठी जाणारे यात्रेकरू मागील एक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सराव करत आहेत. मात्र, येथे ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त असल्याने नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.ही बाब लक्षात येताच दिलीप ठाकूर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना लेखी निवेदन देऊन तसेच निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांची चार वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आवश्यक ती कार्यवाही केली. ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर हनुमान जयंतीच्या दिवशी ओपन जिममधील सर्व नादुरुस्त साहित्य दुरुस्त करण्यात आले.यामध्ये एअर वॉकर, सायकलिंग मशीन, ट्विस्टर, पुल-अप बार, लेग प्रेस, सीट-अप बेंच, सिंगल-डबल बार, बेंच प्रेस आदी साहित्यांचा समावेश आहे. या कार्याबद्दल जयकुमार टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मदनेश्वरी व सुभाष देवकते, साईप्रसाद व गौरी, राम भुतडा, मंगला व नामदेव पांचाळ, मिरा येवले, रामदास मुदिराज, मेधा पिंपरखेडे, रजनी फुलारी, निता उपलंचवार, अनिता माळोदे, श्वेता वट्टमवार, बालाजी शिंदे, प्रकाश नागेश्वर, ज्ञानू गुरव, प्रकाश जालणेकर, सुभाष कोटा, मनोज यांनी सत्कार केला.
कार्यक्रमात योग शिक्षिका उर्मिला साजणे व जगन्नाथ अमिलकंठवार यांनी पावसाळ्यात योगाभ्यासासाठी शेड उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.सत्काराला उत्तर देताना जयकुमार टेंभरे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात दररोज व्यायाम करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच आणखी एक ओपन जिम संच बसविण्यात येईल. तसेच नागरिकांनी आपल्या पाल्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळवावे, जेणेकरून नोकरीतील क्रीडा राखीव जागांचा लाभ घेता येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर अंकरला यांनी केले, तर आभार अर्जुन हुरणे यांनी मानले. यावेळी प्रणाली जिल्हेवार, अनिता गोडबोले, संजय बुजुर्गे, संतोष कॅदरकुंटे, विजय केला यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.ओपन जिमचे साहित्य दुरुस्त करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सत्यभामा व रामकृष्ण चक्रावार, अरुण रेणके, सुरेखा शर्मा, राजश्री शर्मा, राजश्री हुरणे, गायत्री मेहता, शोभा व नारायणसिंह चौहान, राम पाठक, वंदना चव्हाण, मिना व विश्वनाथ झुंझारे, शर्मिला व प्रशांत होट्टे, छाया व अशोक दलपे, प्रशांत जोशी, पिंटू बियाणी यांच्यासह नियमित वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
===============
(शीर्षक )
१. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ओपन जिमचे नादुरुस्त साहित्य दुरुस्त; दिलीप ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
२. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या प्रयत्नातून ओपन जिमला नवे जीवन
३. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारामुळे नागरिकांना मिळाला व्यायामाचा दिलासा
४. दिलीप ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; ओपन जिमचे साहित्य दुरुस्त
५. दिलीप ठाकूर यांच्या सातत्याने नादुरुस्त जिम साहित्य झाले कार्यरत
६. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात दिलीप ठाकूर पुन्हा पुढे
७. दिलीप ठाकूर यांच्या हस्तक्षेपाने ओपन जिम पुन्हा सुरू
८. व्यायामप्रेमींना दिलासा; दिलीप ठाकूर यांच्या प्रयत्नांची फळे
९. दिलीप ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे जिम साहित्याची तात्काळ दुरुस्ती
१०. जनतेच्या समस्यांसाठी दिलीप ठाकूर यांचा प्रभावी लढा
*Devashish Govind Tokekar*
Indian Press Union
District Reporter