समर्थ रामदासांनी स्थापित केलेले नेवाश्याचे जागृत महारुद्र दक्षिणमुखी मारुती…
नेवासा/प्रतिनिधी- समर्थ रामदास हे १६६९ साली श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक येथे आले असता त्यांनी स्वयंभू असलेल्या दक्षिणमुखी मारुतीची स्थापना येथे केली.त्यामुळे हे मंदिर देवस्थान लाखो भाविकांचे जागृत श्रध्दास्थान बनले आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. साक्षात्काराची प्रचिती देणारे हे क्षेत्र महाराष्ट्रातील एकमेव स्वयंभू महारुद्र दक्षिणमुखी मारुती म्हणून नावारूपास आले आहे
संत रामदास त्यावेळेस बलोपासनेवर भर दिला होता. भावी पिढी ही निर्व्यसनी व बलशाही व्हावी म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी हनुमंतराय यांना स्फूर्तिस्थान मानून त्यांची हनुमान मंदिरे बांधली होती.त्या पैकी नेवासा या पवित्र क्षेत्रात देखील त्यांनी हे मंदिर बांधले होते.या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून येथील दक्षिणमुखी हनुमान जागृत स्थानामुळे नेवासा बुद्रुक हे तीर्थ क्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे.दक्षिणमुखी मारुतीरायाचे अगाध महिमा सांगणारे हे क्षेत्र असून ही पूर्वी हे क्षेत्र दुर्लक्षितच राहिले जसजसे प्रबोधन,प्रचार प्रसार होत गेला तसतसे या देवस्थानची महती भक्तांना कळू लागली. कोर्ट कचऱ्याची कामे असेल किंवा संकटात सापडलेल्या भक्तांच्या अडचणी असेल तेव्हा भाविक येथे येऊन जागृत असलेल्या या दक्षिणमुखी हनुमान चरणी नतमस्तक होतात.जसजसे लोकांना अनुभव व प्रचिती येत गेली त्यानुसार या स्थानाचा भक्तगण वाढत गेला आहे
श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.पूर्वी येथे संत रामदासकालीन मंदिर लाकडी खनाच्या पध्दतीचे बांधले गेले होते.त्याचा जीर्णोद्धार श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तीर्थक्षेत्र नेवासे क्षेत्राच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर बनले आहे.दर शनिवारी दक्षिणमुखी हनुमान दर्शनासाठी लांबपल्याहून भाविक येथे महती ऐकूण येथे येतात.
दक्षिणमुखी मारुती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गंगाधर शिंदे,सचिव अँड.वसंतराव नवले,खजिनदार माजी सरपंच दादासाहेब कोकणे,विश्वस्त भानुदास रेडे, विश्वस्त धनंजय डहाळे,विश्वस्त सौ.लताबाई बोरकर,विश्वस्त शेषराव डौले, विश्वस्त राजेंद्र मारकळी, संभाजी बेद्रे,सुनील डोहाळे ही मंडळी याकामी अधिक लक्ष घालतात तर ग्रामस्थांच्या वतीने हनुमान जयंती उत्सवासह श्रावण महिन्यातील पारायण सोहळा इतर धार्मिक उपक्रमासाठी योगदान देतात. जागृत असलेल्या दक्षिणमुखी मारुतीरायाच्या दर्शनाने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत हयाच हनुमान जयंतीच्या शुभकामना.
शब्दांकन:-गंगाभाऊ शिंदे-अध्यक्ष दक्षिणमुखी मारुती मंदिर,नेवासा बु.
संकलन-सुधीर चव्हाण,पत्रकार नेवासा
प्रसिद्धी प्रमुख-दक्षिणमुखी हनुमान मंदिर.
*Devashish Govind Tokekar*
Editor/Reporter/Journalist
*INDIAN PRESS UNION*
District Reporter