April 7, 2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन : १२ तास अभ्यास अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन : १२ तास अभ्यास अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीमनगर, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर येथे भीम उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. सुगंध कुट्टी परळी येथे विविध, शैक्षणिक, सामाजिक व स्पर्धा,प्रेरणादायी कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांपासून प्रेरणा घेत सलग १२ तास अभ्यास अभियान या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून, यंदाही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अभियानात परिसरातील सुमारे ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शिक्षणाप्रती आपली बांधिलकी दर्शवली.

या प्रसंगी शहरातील यशस्वी मेकॅनिकल इंजिनियर व सध्या युनायटेड किंगडम (आयर्लंड) येथे मेट्रो रेल्वे विभागात डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले इंजि. राजू जगतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात जिद्द, चिकाटी आणि सातत्य या गुणांचे महत्त्व अधोरेखित करत, “या गुणांच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते,” असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेरणादायी उदाहरणे देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
तसेच, “शिक्षणामुळेच आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो, त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी माता रमाई आंबेडकर सभागृह येथे या उपक्रमाचे उद्घाटन पार पडले. या वेळी इंजि. राजू जगतकर, बीके कलर होमचे संचालक तसेच विनोदी कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला बालाजी जगतकर, अभिजीत कांबळे, आनंद जगतकर, संजय जगतकर, अमोल अवचारे, सिद्धार्थ जगतकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे अध्यक्ष आकाश साळवे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व नागरिकांचे आभार मानले.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION