🟥 BIG BREAKING | शेतकरी अपडेट 🟥
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुढील ₹2,000 चा हप्ता मिळवण्यासाठी Farmer ID (शेतकरी ओळखपत्र) अनिवार्य करण्यात आले आहे.
सरकारने हा निर्णय लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID तयार केलेले नाही, त्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये (₹2,000 प्रत्येकी) दिली जाते. मात्र आता नवीन नियमांनुसार Farmer ID आणि e-KYC पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
जर ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर हप्ता अडकू शकतो किंवा थांबवला जाऊ शकतो, अशी माहिती सरकारने दिली आहे. सध्या हा नियम काही राज्यांमध्ये लागू करण्यात आला असून, लवकरच संपूर्ण देशभर लागू होण्याची शक्यता आहे.
यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्वरित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
✍️ रिपोर्टर : अमर शिवाजी पठारे