श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण करून सुरळीत चालू ठेवा धनाजी जोशी
देगलूर प्रतिनिधी
देगलूर शहरातील एकमेव असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात देगलुर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांची सामाजिक कार्यकर्त्ते धनाजी जोशी यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे त्यांना मागणी केली,
उन्हाळी सुट्टीत लहान मुलांना खेळण्यासाठी व परिवारातील लोकांना फिरण्यासाठी देगलुरात दुसरी कुठे जागा नसल्यामुळे, देगलूर नगर परिषदेच्या हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज उघानाचे नुतन टेंडर काढून लहान मुलांना खेळण्यासाठी नविन साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, याकरिता देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या लक्षात आणून दिले असता मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला घेऊ असे लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाला सुचना दिल्या…
देगलुरातील वृध्द आजोबांना नातवंडे विचारतात कि आम्हाला शिवाजी पार्क ला कधी नेणार ? आम्हाला शिवाजी पार्क ला जाऊन खूप खेळायचे,मला तर एक महिना सुट्ट्या लागणार…..
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
District Reporter