श्रीगोंदा ( शिवप्रहार न्यूज नेटवर्क) याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन आरोपीविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, पंकज व्यवहारे, प्रकाश मांडगे, रोहित येमुल यांचे पथक तयार केले.
सदर पथकास श्रीगोंदा तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. वर नमुद पथक दिनांक 30/03/2026 रोजी रात्री श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैध धंद्याची माहिती काढणे कामी पेट्रोलींग करीत असतांना असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत काष्ठी ते श्रीगोंदा रोडने एक पिकअप गाडीमधुन गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी घेवुन जात असल्याची माहिती मिळाली. तात्काळ सापळा रचुन थांबले असता काष्टीकडुन एक पिकअप गाडी येतांना दिसली तेव्हा पथकाने सदर पिकअप गाडी थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) सोहम यशवंत टिळे वय- 21 वर्षे रा. टिळेवाडी, राहु ता.दौंड जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास पिकअपमधील गोवंशीय जनावरे कोणाचे व कोठे घेवुन जात आहे. याबाबत विचारपुस करता त्याने सांगितले की, सदरचे गोवंशीय जानावरे हे मी व माझे साथीदार 2) ओंकार दशरथ सायकर रा. राहु थोरली विहीर ता.दौंड जि.पुणे (फरार) असे आम्ही दोघांनी विकत घेवुन इसम नामे 3) हिम्मत कुरेशी रा.धाराशिव (फरार) 4) शोएब ताहेर कुरेशी रा.खडकत ता.आष्टी जि.बीड (फरार) यांचे सांगणे वरुन कत्तली साठी घेवुन जात असल्याचे सांगितले.
सदर आरोपीचे कब्जातुन 2,10,000/- रुपये किमतीचे 05 जिवंत गोवंशीय जनावरे, 5,00,000/- रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम.एच.23. ए.यु.0043, 20,000/- रु कि.ची एक मोबाईल असा एकुण 7,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 270/2026 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5, (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 11(1)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
District Reporter