April 2, 2026

श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई: २७ हरवलेले मोबाईल मालकांना परत

तब्बल २७ मोबाईल श्रीरामपूर पोलीसांनी केले परत…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून मूळ मालकांना डीवायएसपी श्री.जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांच्या हस्ते परत देण्यात आले.दरम्यान या २७ मोबाईल मध्ये अनेक महागडे मोबाईल देखील असून नागरिकांनी मोबाईल हाताळताना काळजी घ्यावी,जबाबदारीने मोबाईल हाताळावा.मोबाईल चोरी वा गहाळ झाल्यास आरोपी त्याचा गुन्हा करण्यासाठी गैरवापर करतो त्यामुळे ही खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/सचिन दुकळे, पोकॉ/रामेश्वर तारडे, पोकॉ/रविंद्र शिंदे, पोकॉ/सागर बनसोडे, पोकॉ/अमोल गायकवाड यांनी केली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
District Reporter

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION