April 6, 2026

श्रीरामपूरचे शिवभक्त, रामभक्त रोहित भालेकर यांचे रत्नागिरी येथे अपघातात दुःखद निधन…

श्रीरामपूरचे शिवभक्त, रामभक्त रोहित भालेकर यांचे रत्नागिरी येथे अपघातात दुःखद निधन…

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर शहरातील बेलापूररोड बजरंगनगर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले रोहित संतोष भालेकर यांचे चिपळूण जि.रत्नागिरी येथील परशुराम घाटात अपघाती निधन झाले.रोहित भालेकर हे आदित्य बिर्ला इन्शुरन्स कंपनीमध्ये नाशिक शहरात एरिया सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत होते. दरम्यान सुट्टी असल्याने ते त्यांच्या कंपनीचे ०३ सहकारी यांच्यासह गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेले असताना हा अपघात झाला.
शिवभक्त, रामभक्त असलेल्या रोहित भालेकर उर्फ नन्हा यांचे शिवप्रहार प्रतिष्ठान संघटनेत देखील अतिशय चांगले योगदान होते.शिवप्रहार संघटनेच्या शिवकार्यात,देव-देश-धर्म कार्यात प्रथमपासून सक्रिय सहभाग घेत आले होते.त्यांच्या जाण्याने भालेकर परिवारासह बेलापूररोड,बजरंगनगर परिसरावर शोककला पसरली आहे.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजता बजरंगनगर बेलापूररोड वार्ड नंबर 07 येथील त्यांच्या निवास स्थानापासून निघेल.

*Devashish Govind TOKEKAR
*INDIAN PRESS UNION*
District Reporter

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION