April 1, 2026

सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महापुरुषांचे विचार अंगीकारल्यास व्यक्तिमत्व घडते – प्राचार्य केशव भांगे

सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महापुरुषांचे विचार अंगीकारल्यास व्यक्तिमत्व घडते – प्राचार्य केशव भांगे

बीड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत तालुकास्तरीय परीक्षा दिनांक ३० मार्च २०२६ रोजी शिरूर कासार येथे उत्साहात पार पडली.

ही परीक्षा कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील एकूण १७४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेपूर्वी भव्य उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य केशव भांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जायभाय बी. आर., मुख्याध्यापक संतोष सानप, गर्जे सर, जितेश उगलमुगले, ढाकणे सर, चव्हाण सर, पर्यवेक्षक जे. एम. काळे, उपप्राचार्य देशमाने बी. के., प्रा. संजय काकडे, प्रा. महारुद्र डोंगरे, पत्रकार मनोज परदेशी व प्रा. शशिकांत जावळे उपस्थित होते.

स्वागत समारंभात सर्व मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य भांगे यांनी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच महापुरुषांचे विचार आत्मसात केल्यास जीवनात प्रगती निश्चित होते, असे प्रतिपादन केले. प्राचार्य बी. आर. यांनीही महापुरुषांचे विचार हेच आजच्या काळात मार्गदर्शक असल्याचे सांगितले. पत्रकार मनोज परदेशी यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले.

या स्पर्धेत कालिकादेवी विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, शासकीय निवासी विद्यालय, आयडियल इंग्लिश स्कूल, एकलव्य विद्यालय, यशवंत होळकर विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, न्यू स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल आदी शाळांचा सहभाग होता.

स्पर्धेनंतर तात्काळ निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कार्तिकी नंदू अनाप, आकांक्षा उमाकांत खेडकर, अस्मिता अभिमन्यू कातखडे, पृथ्वीराज बाळू उगले, भार्गवी कैलास तुपे, शिवम गोरक्ष तुपे, आर्या बाबासाहेब ढाकणे, विशाल संतोष ढाकणे, वैष्णवी संदीप थोरात, सोनाली गणेश भुजबळ, वैष्णवी महिपती काळे व स्वरा लक्ष्मीकांत भांडेकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. हे विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

स्पर्धेचे आयोजन श्रीमती अनिता लाटे, जयेंद्र निकम, प्रा. नारायण घोलप, प्रा. रेखा निर्मळ, नितीन बहिर, आप्पासाहेब कांबळे, राजू बडे, प्रा. नारायण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. परीक्षा कामकाज प्रा. प्रशांत मळेकर यांच्या नियोजनात यशस्वीपणे पार पडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुनील मोरे, प्रा. सविता दराडे, प्रा. अशोक इनकर, प्रा. घायाळ बी. एम., प्रा. संजय आव्हाड, श्री. बडे आर. डी., प्रा. अनिल जरे, डॉ. सत्यनारायण ढवळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक प्रा. शशिकांत जावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नारायण तांबे यांनी मानले.

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION