🟥 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🟥
लग्नाच्या आमिषाने २८ वर्षीय तरुणावर ७ वर्षे अत्याचार
पुणे शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर एका २८ वर्षीय तरुणीची प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करून तिच्यावर तब्बल सात वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितेची ओळख २०१८ साली एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला आणि भावनिकरित्या तिला आपल्या जाळ्यात अडकवले.
या विश्वासाचा फायदा घेत आरोपीने वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने अनेक वेळा लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने विविध कारणे सांगून विषय टाळला. सात वर्षांच्या कालावधीत आरोपीने सतत तिची फसवणूक केली.
अखेर काही दिवसांपूर्वी आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर पीडितेला आपल्यावर अन्याय झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिने धैर्य दाखवत पुणे पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिस आरोपीकडून सखोल चौकशी करत आहेत.