March 9, 2026

बिलोलीत आमदार विक्रम काळे यांची सांत्वन भेट; शिक्षक प्रश्नांवरही घेतला आढावा

अमरदीप दगडे
बिलोली : मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार विक्रम काळे यांनी बिलोली येथे भेट देत माजी आमदार तथा आंतरभारती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय गंगाधररावजी पटणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवंगत पटणे यांच्या पत्नी नंदाताई पटणे व त्यांच्या स्नुषा जयमाला पटणे यांच्याशी संवाद साधत स्वर्गीय पटणे यांच्या कार्याचा उल्लेख केला व त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले.
पत्रकार शंकर पवार यांच्या निवासस्थानी चहापान करताना त्यांनी शिक्षकासंबंधी विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली. यामध्ये मुख्यत्वे करून नुकत्याच झालेल्या संच मान्यतेच्या निकषानुसार अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांना शासनाने विद्यार्थी वाढविण्याच्या अटीवर या शिक्षकांना एक वर्ष अतिरिक्त ठरवू नये अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदान तत्त्वावर नियुक्त झालेल्या परंतु 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सतत चा पाठपुरावा करत राहण्याचे आश्वासन दिले. सर्व खाजगी अनुदानित शाळांना वेतन्यत्तर अनुदान देणे बाबत शासनास विनंती करणार.तसेच शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामास आदेश काढून जुंपणे याबद्दलही त्यांनी प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. माध्यमिक मुख्याध्यापकाप्रमाणे प्राथमिक मुख्याध्यापकांनाही त्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण मिळवून देण्यासाठी सर्वोतपरि प्रयत्न करणार .टप्पा अनुदानावर असलेल्या सर्वच शाळा महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान मिळवून देवू असेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण मराठवाड्यातील शिक्षक हे माझे कुटुंब असून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे हे माझे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या या सहपरिवार भेटीदरम्यान पत्रकार शंकर पवार, अशोक दगडे, भाऊसाहेब बनबरे, अमरदीप दगडे, साईराज रुद्ररकर, श्याम पवार यांची उपस्थिती होती.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION