March 7, 2026

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत

कोल्हापूर, दि. ६ ( प्रतिनिधी ) : सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव तथा पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत यांनी दिल्या.
बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अन्न व औषध प्रसासन विभागाचे सहायक आयुक्त महेश कवटीकवार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. व्ही.ए. अरादेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. दीपक लाडे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आदी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी, वर्तमानपत्रांत किंवा भिंतींवर दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करुन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला गाड्या लावून उपचाराचा दावा करणाऱ्या अमान्यता प्राप्त लोकांवरही कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यक पदवी किंवा वैद्यकीय कौशल्य नसताना कोणी उपचार करत असेल तर पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत यासाठी पोलीस विभागाकडून तातडीने सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत दिली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींची यादी जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती डॉ. दीपक लाडे यांनी दिली.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION