February 25, 2026

शिरूर मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित परमपूज्य आचार्य प्रदीप जी मिश्रा ( सीहोर वाले ) यांचे शिवपुराण कथा

पुणे जिल्हा रिपोर्टर. प्रभू रामचंद्र च्या पदस्पर्शाने शिवलिंग स्थापित शिवसेनेची आख्यायिका जगप्रसिद्ध आहे. पंडित आचार्य प्रदीप जी मिश्रा सीहोर वाले यांच्या अमृतवाणी मधून शिव पुरण कथेस सुरुवात झाली. ही कथा 24 फेब्रुवारी ते दोन मार्च 2026 या कालावधीपर्यंत दररोज दुपारी एक ते चार या वेळेस हा अध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवपुराण कथेचे सभा मंडप व कार्यक्रमाचे आयोजक प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल,उद्योगपती आदित्य धारीवाल  साक्षी धारीवाल व दिना भाभी धारीवाल व माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल मल्लाव व पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शरद मल्लाव व आजी व माजी नगरसेवक व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते. तसेच रामलिंग गावचे आजी व माजी सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. प्रसिद्ध जग विख्याते परमपूज्य आचार्य प्रदीप जी मिश्रा सिहोरवाले दररोज नियमित शिवपूजा व हिंदीवर एक तांब्याभर पाणी घालावे असे ते म्हणाले श्री प्रभू श्रीराम वनवासत असताना त्यांनी शिवपूजेसाठी वाळूने मूर्ती बनवून ते सूर्यास्त अगोदर विसर्जित करायचे. पण काही काळासाठी त्यांना निद्रा अवस्थेत गेल्यामुळे  शिवलिंग तिथेच चिकटले गेले. ही आख्यायिका आहे. त्यामुळे इथे भावीक हे जगभरातून येत असतात. आज रामलिंग रोड मध्ये भाविकांची वाहनांची ठिकठिकाणी पार्किंगची  व्यवस्था करण्यात आली होती व तसेच शिवभक्तांनी हर हर महादेव ची घोषणा देऊन वातावरण शिवमय केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION