शिरूर मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित परमपूज्य आचार्य प्रदीप जी मिश्रा सिहोर वाले यांचे शिवपुराण कथा वाचनास सुरुवात.
पुणे जिल्हा रिपोर्ट. प्रभू रामचंद्र च्या पदस्पर्शाने शिवलिंग स्थापित शिरूर शहराची आख्यायिका जगप्रसिद्ध आहे. परमपूज्य पंडित आचार्य प्रदीप जी मिश्रा सिहोर वाले यांच्या अमृतवाणी मधून शिव पुराण कथेची सुरुवात झाली ही कथा 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीपर्यंत दररोज दुपारी एक ते चार या वेळेस हा अध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवपुराण कथेचे सभामंडप व कार्यक्रमाचे आयोजक प्रसिद्ध उद्योगपती श्री प्रकाश धारीवाल उद्योगपती आदित्य धारिवाल साक्षी धारीवाल व दिनाबाबी धारीवाल यांनी केले. या कथेला उपस्थित माझी आमदार अशोक पवार माजी आमदार पोपटराव गावडे शिरूर नगरपरिषद नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णे, माझी व आजी नगरसेवक, भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मल्लाव, पुणे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण मल्लाव, शिरूर ग्रामीणचे आजी माजी सरपंच व ग्रामस्थ, महाराष्ट्र पोलीस व पत्रकार बंधू उपस्थित होते. प्रसिद्ध जगविख्याते परमपूज्य आचार्य श्री प्रदीप जी मिश्रा सिहोर वाले दररोज नियमित शिव पूजा व पिंडीवर एक तांब्याभर पाणी घालावे असे ते म्ह
णाले श्री प्रभू श्रीराम मनवासत असताना त्यांनी शिवपूजेसाठी वाळू ने शिवलिंग बनवून ते सूर्यास्त अगोदर विसर्जित करायचे पण काही काळासाठी त्यांना निद्रा अवस्थेत गेल्यामुळे शिवलिंग तिथेच चिकटले गेले आहे. त्यामुळे येथे भाविक हे जगभरातून येत असतात. आज रामलिंग रोड येथे भाविकांची वाहनांची ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती व तसेच शिवभक्तांनी हर हर महादेव ची घोषणा देऊन वाहतो शिवमय केले. शिव महापुराण अतिशय आयोजन 30 सेकंद मध्ये केली आहे. शिरूर शहरांमध्ये आतापर्यंत पहिल्यांदाच असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांना नम्र विनंती आहे की त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. शिरूर शहरांमध्ये आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐