March 7, 2026

सार्वजनिक ठिकाणी पोलीस विभागाने व्यसनमुक्त अंमलबजावणीच्या अनुषंगाने कारवाई कराव्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 6 ( प्रतिनिधी ) : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा ,महाविद्यालय, हॉस्पिटल आदी ठिकाणी सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने प्रदर्शन कायदा 2003 (COTPA) ची प्रभावीपणाने अंमलबजावणी करताना पोलीस विभागाने थेट धडक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे . या अभियानाची प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा तंबाखूमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पावले संबंधित विभागाने उचलावीत, आगामी तीन महिन्यात विशेषता शासकीय कार्यालये आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये १०० टक्के सिगारेट – तंबाखू आदी व्यसनमुक्त करावीत असे निर्देश देवून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांना आर्थिक दंड आकारण्यात यावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
प्रारंभी या अभियानाचे जिल्हा सल्लागार डॉ . विक्रम आरळेकर यांनी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील किती लोकांनी तंबाखू सोडली याबाबत माहिती बैठकीत दिली.
या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, डॉ भूषण मिरजे, चारुशीला कणसे, क्रांती शिंदे,शशिकांत कदम अर्चना पाथरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION