June 25, 2026

सार्वजनिक तालीम, काची आळी येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत नागरिकांमध्ये संताप

पुणे जिल्हा रिपोर्टर.

पुणे, दि. २५ जून २०२६ :

काची आळी येथील सार्वजनिक तालीमची जागा गेल्या ३० ते ४० वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असून त्या ठिकाणी झालेल्या कथित अनधिकृत अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेली ही जागा अनेक वर्षांपासून पडीक पडलेली असल्याने परिसराच्या विकासालाही खीळ बसली आहे.

नागरिकांच्या मते, सार्वजनिक तालीम ही सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र योग्य देखरेखीअभावी जागेवर अतिक्रमण वाढत गेले आणि मूळ उद्देशाला बाधा पोहोचली. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सदर जागेची तातडीने मोजणी करून अनधिकृत अतिक्रमण हटवावे, तसेच जागेचा ताबा सार्वजनिक तालीम संस्थेकडे देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनासह समाजाचीही जबाबदारी असून, संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी काची आळी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

– प्रतिनिधी, काची आळी, पुणे

Written by

ANIL DIVANJI MALLAV MALLAV

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION