जिल्हा रिपोर्टर पुणे. भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कार्यालय शिरूर मध्ये पुणे जिल्हा कोषाध्यक्ष व नवीन सदस्य सभासद नोंदणी साठी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शिरूर शहरातील शाखाप्रमुख व वॉर्ड प्रमुख याबद्दल महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव व पुणे जिल्हा अध्यक्ष यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल मल्लाव यांच्या आदेशाने व श्री. योगेश डोळस महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव व श्री. लक्ष्मण मल्लाव यांच्या नेतृत्वाखाली आज सदस्य सभासद पदी पुढील प्रमाणे श्री. प्रकाश दत्तात्रय चौधरी व संदीप अशोक कोठावळे यांची सदस्य सभासद म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व सभासद यांना संविधानाची शपथ देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना नवीन सभासदांना उद्देशून सांगितले की आपण सर्व एक आहोत. आणि एक मिळून पार्टीसाठी टीम वर्कने काम करू पार्टीचे संघटन मजबूत व मोठे करण्यात योगदान देऊ. तसेच गोरगरीब व दुर्बल घटकांसाठी व तळा गळातील लोकांसाठी संघर्ष करू. असे कोणतेही काम करणार नाही त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल. पक्ष संघटना पुढे नेण्यासाठी मी नेहमीच संघर्ष करी
ल. यावेळी भारतीय जनवादी पार्टी चे पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री सचिन सुदाम मल्लाव व शिरूर तालुका कार्याध्यक्ष रोहित मल्लाव व इतर सभासद उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष यांनी नवीन सदस्य सभासद यांना निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या…💐💐💐💐💐💐🙏🙏🙏