सशक्त सुदृढ आत्मनिर्भर
"सशक्त सुदृढ आत्मनिर्भर "
भारतीय वायू सेनेचे प्रमुख Air Chief Marshall अमर प्रीत सिंह ह्यांनी जेव्हा कार्यभार सांभाळला तेव्हा त्यांनी वायू सेनेला एक घोष वाक्य दिले. "सशक्त सुदृढ आत्मनिर्भर ". थोडक्यात म्हणजे " Empowered Srong and Selfreliant .आपल्या राष्ट्राच्या , भारतीय वायू सेने कडून काय अपेक्षा होत्या आणि आहेत हे त्यांनी नेमके वर्णन केले. बघुया हा प्रवास कसा झाला आहे.
जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण सर्व बाबतीत इतर देशांवर अवलंबून होतो. संरक्षण सामुग्री सुद्धा याला अपवाद नव्हती. आपली वायुसेना ही पूर्णपणे विदेशी यंत्रणेच्या आधारे उभारली गेली होती.
मात्र १९४० साली एका व्यक्तीने सर्वप्रथम आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहिले आणि २३ डिसेंबर १९४० रोजी श्री वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्तान एयरक्राफ्ट लिमिटेड चि स्थापना केली. १९४२ पासून HAL नि Harlow PC5, Curtis P36 आणि A31 Vengeance ह्या विमानांचे license production सुरू केले. १९५१ साली HT-2 या piston engine trainer हे आपल्या देशात बनवले जाणारे प्रथम विमान ह्यानी आकाशात झेप घेतली. आपल्या वायुसेनेच्या दृष्टीनी हे एक छोटे पण महत्वाचे पाउल ठरले. हे विमान प्रशिक्षणासाठी १९९० पर्यंत वापरात होते. १२ विमाने आपण Ghana ला पण निर्यात केली. ह्याच सुमारास वायुसेनेच्या गरजेनुसार supersonic विमानाचे डिझाईन सुरू झाले. ह्या डिझाईन साठी भारत सरकार ह्यानी German Engineer Kurt Tank ह्यांची मदत घेतली. हे विमान म्हणजे HF-24 मरुत. १९६७ साली ही विमाने वायू सेने मध्ये सामील झाली. दुर्देवाने, त्यावेळेच्या राजकीय परिस्थिती मुळे ह्या विमानासाठी आपल्याला योग्य असे इंजिन मिळाले नाही आणी HF24 हे विमान आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही.
१९६२ च्या चीन बरोबर झालेल्या युद्धानंतर आपल्याला जाणवले की परदेशी सामुग्री वर अवलंबून राहणे हे धोक्याचे आहे. आपण त्या वेळेच्या सोविएत संघराज्य बरोबर MiG21 या विमानाचे खरेदी आणि license प्रॉडक्शन चा करार केला. या करारानुसार ही विमाने भारतात बनवली जाणार होती. त्यानुसार ०१ ऑक्टोबर १९६४ रोजी हिंदुस्तान एयरक्राफ्ट लिमिटेड आणि Aeronautics India ह्यांचे विलीनीकरण होऊन Hindustan Aeronautics Limited चि स्थापना झाली .
१९६७ साली HAL नि license production केलेले विमान आकाशात झेपावले आणि १९ ऑक्टोबर १९७० साली पूर्ण पणे भारतीय बनावटीचे MiG21 हे वायुसेनेत सामील झाले.
१९६५ आणी १९७१ च्या युद्धात आपल्या हे लक्षात आले . आपल्याला बदलत्या युद्धनीती आणी आपल्या शेजारच्या राष्ट्रांच्या संरक्षण क्षमतेच्या समोर टिकून राहायचे असेल तर आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे हे सरकार च्या लक्षात आले.
१९८३ साली LCA light combat aircraft हा प्रोग्राम मंजूर करण्यात आला व त्या अनुषंगाने १९८४ साली Aeronautical Development Agency चि स्थापना झाली. ADA आणि HAL ह्यांच्याकडे LCA-Tejas चि जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचबरोबर १९८४ साली HAL ला ALH म्हणजे Advanced Light Aircraft बनवण्याचे कंत्राट देण्यात आले. हे हेलिकॉप्टर २०००० फूट पर्यंत सामान घेऊन जाण्याचे क्षमतेचे असणे गरजेचे होते तसेच भूदल साठी चिलखती आवरण हवे होते तर नौदलासाठी समुद्रात युद्ध नौका वरुन उड्डाण करण्यास सक्षम हवे होते. LCA आणि ALH चि जबाबदारी कठीण होती कारण आपल्या कडे संशोधन आणी विकास ह्या वर खर्च करण्याची वृत्ती नव्हती. ह्या सगळ्या अडचणी वर मात करून आज LCA and ALH हे भारतीय आकाशात उडत आहेत.
ह्या विमानांच्या निर्मिती च्या अनुभवानंतर HAL नि पुढचे प्रगत आवृत्ती कडे झेप घेतली. वायुसेनेच्या ताफ्या saathi Tejas Mk1A आणी Mk2 hi आवृत्ती आणी नौदला साठी carrier based version. ALH च्या अनुभवावरून आपण Light Combat Helicopter रुद्र आणी प्रचंड ही हेलीकॉप्टर पण बनवली. ही हेलीकॉप्टर युद्धात शत्रू च्या रणगाडे ह्यांचा नाश करू शकते.
एक आक्षेप HAL विरुद्ध घेतला जातो की त्यांना विमान बनवायला खूप वेळ लागतो. सहज गम्मत म्हणुन आपण जर USA च्या F35 प्रोग्राम कडे लक्ष दिले तर असे लक्षात येईल, की हा प्रोग्राम १९९३ मध्ये प्रस्तावित करण्यात आला आणि त्यांना IOC initial operating capability che प्रमाणपत्र हे टप्पा टप्प्यात 2016 ते 2019 मधे मिळाले आणि त्यांचे प्रॉडक्शन 2024 मध्ये सुरू झाले.
हे सगळे सुरू असताना आपण Su-30 आणी MiG-29 ह्यांचे उत्पादन HAL च्या विविध ठिकाणी होत होते.
LCA आणि ALH च्या अनुभवावरून शासनास ही जाणीव झाली की संरक्षण क्षेत्रांत सुद्धा खाजगी क्षेत्रातील कंपनी ह्यांना परवानगीने उत्पादन करू द्यायला पाहिजे. हिचे दोन प्रमुख फायदे होते की सार्वजनिक संपत्ती संशोधन आणि विकास मध्ये खर्च होणार नाही. तसेच खासगी क्षेत्रात त्यामुळे स्पर्धा होईल आणी उत्पादन क्षमतेचा आणि गुणवत्तेचा फायदा होईल.
ह्याची सुरुवात आपण Tata Group and Adani Defence बरोबर केली. Tata ह्यानी Airbus बरोबर C-295 ह्या Medium Range Medium lift Tactical Transport च्या उत्पादनाचा करार केला. त्या अनुषंगाने त्यांनी वडोदरा येथे एक पूर्ण नवीन ecosystem तैयार केली आणी आपल्या देशात बनवलेले पहिले C-295 ह्यानी उड्डाण केले आहे. हे विमान 9 टन चा भार किंवा 71 सैनिक किंवा 50 paratroopers घेऊन जाऊ शकतो. 6 टन चा भार घेऊन हे विमान Thiruvananthapuram पासून देशाच्या कुठल्याही कोपर्यात जाऊ शकते. Portblair वरुन अत्यंत दुर्गम अश्या लडाख मधील दौलताबाद Advanced Landing Ground जे 16500 फूट वर आहे, तिथे पण जाऊ शकते.
हे सगळे सुरू असताना आपण Drones च्या युद्धात पण मागे नाही आहोत. जिथे आपण Israel निर्मित Heron, Searcher, Harop Drones टेहळणी साठी वापरत आहोत तिथेच आपण अमेरीकन SeaGuardian and Predator ही Drones पण वापरत आहोत. ह्याच बरोबर Adani ह्यानी ELBIT ह्या इस्रायली कंपनी बरोबरच्या करारानुसार Hermes-900 किंवा दृष्टी हा Drone हैदराबाद येथे उत्पादन करत आहोत. हा Drone 36 तास आकाशात राहू शकतो आणि 1500 ते 2000 किलोमीटर पर्यंत टेहळणी करू शकतो. हा Drone LOS( Line of Sight) किंवा BLOS( Beyond Line of Sight) च्या पद्धतीने कंट्रोल करता येतो.
ह्या सर्व आधुनिकीकरण मध्ये आपण AEW&C ला विसरलो नाही. AEW&C म्हणजे Airborne Early Warning and Control. थोडक्यात ही अशी प्रणाली आहे जी आपल्या देशाच्या हवाई हद्दीत राहून शत्रूच्या विमानाची हालचाल बघू शकते आणि त्याप्रमाणे आपल्या fighter aircraft ना direct करू शकते. DRDO ni बनविलेली NETRA नेत्रा ही हवाई प्रणाली DRDO नि वायुसेनेच्या सेवेत सुपूर्द केली आहे. ह्या AEW&C मधून तुम्ही 200 targets हे 300 किलोमीटर च्या अंतरावरून ट्रॅक करू शकता.
आपण आता 5th Generation fighter कडे वळू या. ह्या विमानाच्या विकासासाठी DRDO नि तीन व्यापारी कंपनी शॉर्टलिस्ट केल्या आहेत. TATA Advanced systems Limited, Larsen & Toubro Consortium आणि Bharat Forge Consortium. हे सगळे सुरू असताना Russia नि त्यांच्या Su57 ह्या 5g fighter च्या उत्पादन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
आपण त्याच बरोबर फ्रेंच कंपनी Dassault बरोबर पण त्यांची Rafale ही विमाने आपल्या देशात उत्पादन करण्याच्या चर्चेत आहोत.
भारतीय वायुसेना ही HT-2 ह्या अत्यंत प्राथमिक अश्या विमाना पासून Rafale या अती प्रगत विमाना च्या निर्मिती पर्यंत पोहोचलोनभः स्पृशं दीप्तम् आहो.
थोडक्यात आपण वायू सेनेच्या बोधवाक्य खरे करण्याचा मार्गावर आहोत.
"नभः स्पृशं दीप्तम्"