NATIONAL CATEGORY

चारकोप पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाऊंडेशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-08-31 05:30 • 2 views   Share WhatsApp Share Facebook Share X
चारकोप पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाऊंडेशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात

चारकोप पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाऊंडेशनतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात

मुंबई | दि. २७ ऑगस्ट २०२६

युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चारकोप पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

हा सामाजिक उपक्रम संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे आणि राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. स्मिता ताई बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी एसपीआय श्री. महेश बळवंतराव तसेच चारकोप पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई महिला टीममधील अमिना खान – उत्तर मुंबई जिल्हा महिला सल्लागार, हीरा पायल – दहिसर पूर्व तालुका संघटक, आशा केळकर – कांदिवली पश्चिम तालुका संघटक आणि नयना वाढेर – सदस्य यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

या उपक्रमातून पोलीस आणि समाजातील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासोबतच पोलिसांच्या सेवेला सन्मान देण्याचा संदेश देण्यात आला. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्या सेवेला सन्मान देणे महत्त्वाचे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

“हर घर क्रांती, जय युवा क्रांती!”

जय हिंद! जय महाराष्ट्र!

AMAR SHIVAJI PATARE 0 followers