NATIONAL CATEGORY

दिंडोशी पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाउंडेशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-08-31 05:31 • 1 views   Share WhatsApp Share Facebook Share X
दिंडोशी पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाउंडेशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात

दिंडोशी पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाउंडेशनतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम

मुंबई, मलाड पूर्व | दि. २८ ऑगस्ट २०२६

युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ यांच्या आदेशानुसार, युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने मलाड पूर्व येथील दिंडोशी पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. स्मिता बांदेकर ताई यांचे मार्गदर्शन लाभले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्याबद्दल आणि समाजासाठीच्या योगदानाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र शिंदे यांनी युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केल्याबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमास सुचित्रा रेडियर, मालाड पूर्व महिला तालुका अध्यक्षा; तनिष्का रेडियर, मालाड पूर्व तालुका युवती उपाध्यक्षा; श्री. रोहित गुप्ता, उत्तर मुंबई जिल्हा युवा उपाध्यक्ष; तसेच श्री. कमलेश यादव, मालाड पूर्व सदस्य यांची उपस्थिती होती.

पोलिसांसाठी मेडिकल किटचे वाटप

या उपक्रमादरम्यान पोलिसांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन मेडिकल किटचेही वाटप करण्यात आले. डॉ. योगेश लखानी, ब्राईट मीडिया लिमिटेडचे ओनर, यांनी मुंबई अध्यक्ष श्री. धनेश रामरखनी यांच्याशी संपर्क साधून पोलिसांसाठी मेडिकल किट उपलब्ध करून दिल्या.

मेडिकल किट उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी संबंधित उपक्रमाचे स्वागत केले.

रक्षाबंधनाच्या माध्यमातून पोलीस आणि समाजातील संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पोलिसांच्या सेवेला सन्मान देत त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा हा उपक्रम सामाजिक सहभागाचे उदाहरण ठरला.

श्री. धनेश रामरखनी
मुंबई अध्यक्ष

AMAR SHIVAJI PATARE 0 followers